MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह by Ksagar, V S Kshirsagar
Book Summary:
के'सागर पब्लिकेशन्सने राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रकाशित केलेल्या संस्करित प्रश्नपत्रिका संग्रहाच्या गत सहा-सात वर्षांच्या कालावधीत एकोणीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यावरून संस्करित प्रश्नपत्रिका संग्रहाची ही संकल्पना विद्यार्थिमित्रांना किती भावली होती व उपयुक्त ठरली होती, हे ध्यानी यावे.
सन २०१२ मध्ये आवोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात काही मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा केल्या. पूर्वीच्या सहा घटकांचा समावेश असलेल्या २०० गुणांच्या सामान्य क्षमता चाचणी या एका पेपरऐवजी आपणास आता दोन पेपर्सचा सामना करावा लागत आहे. या पेपर्सना कोणतीही विशिष्ट नावे नसली तरी अभ्यासक्रमाचे स्वरूप लक्षात घेता पिल्या पेपरला आपण “सामान्य अध्ययन' म्हणून ओळखू शकतो, तर दुसऱ्या पेपरला “नागरी सेवा कल चाचणी' म्हणून संबोधू शकतो. पहिल्या पेपरमध्ये आपणास दोन तासात २०० गुणांच्या १०० प्रश्नांचा सामना करावा लागतो तर दुसर्या पेपरमध्ये आपणास दोन तासात २०० गुणांचे ८० प्रश्न सोडवावे लागतात.
प्रस्तुतचा संदर्भ टा आपल्या पहिल्या पेपरच्या म्हणजे सामान्य अध्ययनाच्या पेपरशी निगडित आहे. सन २०१३ पासून आतापर्यंत नव्या अभ्यासक्रमानुसार एकूण सात राज्यसेवा पूर्व परीक्षा होऊन गेल्या आहेत. विद्यार्थिमित्रांच्या मागणीनुसार २०१३ ते २०१९ या कालावधीतील पहिल्या पेपरच्या सात प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला हा “घटकनिहाय विश्लेषणात्मक व स्पष्टीकणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह' आज आपल्या हाती सोपवित आहे.
Audience of the Book :
This book Useful for MPSC.